महावितरण कंपनीमध्ये विद्यूत सहाय्यक पदाच्या 5347 जागा भरण्यासाठी मिळाली मूदतवाढ

Mahavitran company recruitment
Mahavitran company recruitment 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र व इच्छूक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महावितरण मध्ये विद्यूत सहाय्यक पदाच्या 5347 जागा.

महावितरण कंपनीमध्ये विद्यूत सहाय्यक पदाच्या जागा भरण्यासाठी मूदतवाढ मिळाली असून आता दिनांक  20 मे 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतील यासाठीची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरु आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० मे २०२४ आहे.

महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे.

प्रवर्ग निहाय रिक्त जागांची संख्या खालीलप्रमाणे.

  • अनुसूचित जाती - 673
  • अनुसूचित जमाती - 491
  • विमुक्त जाती (अ) -150
  • भटक्या जाती (ब) - 145
  • भटक्या जाती (क) - 196
  • भटक्या जाती (ड) - 108
  • विशेष मागास प्रवर्ग - 108
  • इतर मागास प्रवर्ग - 895
  • ईडब्ल्यूएस - 500
  • अराखीव - 2081

विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण रिक्त जागा = 5347

विद्यूत सहाय्यक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता.

विद्युत सहाय्यक पदासाठी शैक्षणिक पाञता खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.  

व तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर ) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री / तारतंत्री ) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. (ITI Electrician) उतीर्ण आसणे आवश्यक.

वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे

परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग – रु. २५० + GST
मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ प्रवर्ग – रु. १२५ + GST

नोकरीचे ठिकाण - महाराष्ट्र राज्य.

सविस्तर जाहीरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments