Pimpri chinchwad mahanagar palika bharti पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अस्थापनेवरील अग्निशमन विभागातील गट ड संवर्गातील विविध पदाच्या 150 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
त्यानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे गट ड संवर्गातील एकूण 150 जागा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांच्या अस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्यूलर या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरिता (आचारसंहितेपूर्वी) दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या दैनिक सकाळ, दैनिक लोकमत व दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'Pimpri chinchwad mahanagar palika bharti'
सदरील जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षण निहाय पदसंख्या अर्हता व इतर अटी व शर्ती नमूद केले प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
सदर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र अर्हताधारक उमेदवाराकडून विहीत मूदतीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. Pimpri chinchwad mahanagar palika bharti
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 26 एप्रिल 2024.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक 17 मे 2024 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत.
- ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दिनांक 17 मे 2024. सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत. ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध होतील. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक व ठिकाण www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
- या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
शैक्षणिक अर्हता व वेतनश्रेणी
अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्यूलर या पदासाठी शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे आहे.
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
- एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
- शारीरिक पाञता - उंची 165 सेमी छाती साधारण - 81 सेमी फूगवून 5 सेमी जास्त. वजन 50 कि.ग्रॅ. दृष्टी चांगली.
महीलांसाठी उंची 162 सेमी वजन 50 कि.ग्रॅ. छातीची अट लागू नाही.
खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 30 पेक्षा अधिक व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय 33 वर्षापेक्षा अधिक नसावे.
अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्यूलर या पदासाठी वेतनश्रेणी - S 6 19900 - 63200
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. "Pimpri chinchwad mahanagar palika bharti"
0 Comments