नीट (NEET EXAM) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक महत्वाच्या सूचना व नियम

Neet exam 2024
Neet exam 2024

उद्या नीट परीक्षा होणार असून जाणून घ्या या संदर्भातील सविस्तर माहीती.

नीट (NEET EXAM) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक महत्वाच्या सूचना व नियम

परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी असणारी नियमावली 
नीट ड्रेस कोड :
  1. नीट परीक्षेसाठी जाणाऱ्या मुलांनी हाफ स्लीव्ह शर्ट किंवा टी-शर्ट घालून जावे. साधी पँट घालून जावे. पँटमध्ये खिसे असू शकतात. अनेक साखळ्या आणि मोठी बटणे असलेले कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
  2. विद्यार्थ्यांना शूज घालण्याची परवानगी नाही. त्यांना फक्त चप्पल किंवा सँडल घालण्याची परवानगी आहे. मुली कमी टाचांच्या सँडल घालून येऊ शकतात.
  3. दागिने घालून येण्यासही मनाई आहे. परीक्षेत सनग्लासेस, घड्याळ किंवा टोपी घालून बसण्याची परवानगी नाही. हेअरबँड, ताबीज, बेल्ट, स्कार्फ, अंगठ्या, बांगड्या, कानातल्या रिंग, नाकातील नथ, हार, बिल्ला, मनगटावर घड्याळ, बांगड्या, कानातले आदि धातूच्या वस्तू सोबत आणण्यास मनाई करण्यात आली आहे.
  4. कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र, स्वघोषणापत्र, फोटो आयडी प्रूफ, फ्रिस्किंगशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
  5. जर उमेदवारांनी सांस्कृतिक, पारंपारिक पोशाख, किंवा धर्माशी संबंधित गोष्टी परिधान केल्या असतील, तर त्यांना परीक्षा केंद्रावर तपासणीसाठी रिपोर्टिंग वेळेच्या किमान दीड तास आधी म्हणजे दुपारी १२.३० वाजेपर्यंत कळवावे लागणार आहे.

नीटमध्ये फक्त या गोष्टींना परवानगी आहे.

  1. NEET प्रवेशपत्राव्यतिरिक्त, उमेदवारांनी मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणताही फोटो आयडी पुरावा सोबत आणावा.
  2. प्रवेशपत्रावर पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत न्यावे. प्रवेश पत्रकावर हे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र द्यावे लागणार आहे. फोटोच्या मागची बाजू ही पांढरी असावी. प्रवेशपत्रासह डाउनलोड केलेल्या फॉर्ममध्ये पोस्ट कार्ड आकाराचा हा फोटो लावावा. हे प्रवेश पत्र परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकाला द्यावे लागणार आहे.
  3. जे उमेदवार प्रवेशपत्रासह डाउनलोड केलेल्या प्रोफॉर्मावर पेस्ट केलेले पोस्टकार्ड आकाराचे (4X6) छायाचित्र आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणणार नाहीत त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
  4. उमेदवार एक पारदर्शक पाण्याची बाटली जवळ ठेऊ शकतात.
  5. या सोबतच हँड सॅनिटायझरची ५० मिलीची बाटली देखील सोबत ठेऊ शकतात.
  6. नीट प्रवेशपत्रासोबत स्वयंघोषणा फॉर्म आणि अंडरटेकिंग फॉर्म देखील आणावा लागेल. तो भरलेला असावा.
  7. ही परीक्षा दुपारी २ वाजता सुरू होईल. प्रवेश फक्त अर्धा तास अगोदर म्हणजेच दुपारी १.३० पर्यंत दिला जाणार आहे. दुपारी १.३० नंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.
  8. परीक्षा पेपर लिहिण्यासाठी फक्त निळा किंवा काळा बॉलपॉइंट पेन सोबत ठेवावा लागणार आहे.

या गोष्टी करण्यास मनाई

  1. कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रांवर आणण्यास परवानगी दिली जाणार नाही. 
  2. मोबाईल फोन, ब्लूटूथ, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, पेन्सिल बॉक्स, घड्याळे यांना परवानगी नाही.
  3. परीक्षा केंद्रावर कोणतेही खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही. 
  4. तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये दागिने घालण्याची परवानगी दिली जाणार नाही.

नीट परीक्षा गूणांकन पद्धत व परीक्षेचा निकाल 

  1. यावर्षी देखील नीटचा पेपर ७२० गुणांचा असेल. 
  2. एक प्रश्न चार गुणांचा असेल. 
  3. निगेटिव्ह मार्किंग असेल. 
  4. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. 
  5. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या चार विषयांमध्ये विभाग अ मध्ये ३५ आणि विभाग ब मध्ये १५ प्रश्न असतील. 
  6. १५ पैकी कोणतेही १० प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

नीटचा निकाल १४ जून २०२४ रोजी जाहीर केला जाईल.

Post a Comment

0 Comments