रेल्वे सरंक्षण दल मध्ये एकूण 4660 रिक्त जागांसाठी मोठी पदभरती

RPF Bharti 2024
RPF Bharti 2024

Rpf bharti 2024 रेल्वे संरक्षण दलमध्ये 4660 जागा भरण्यासाठी मोठी पदभरती होणार असून या बाबतची जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. १० वी ते पदवीधर उमेदवारांना रेल्वे संरक्षण दलमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

रेल्वे सरंक्षण दलमध्ये विविध पदाच्या एकूण 4660 जागा.

रेल्वे संरक्षण दल अंतर्गत उपनिरीक्षक आणि हवालदार पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

उपनिरीक्षक व हवालदार पदाच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी ही पदभरती होणार आहे.

उपनिरीक्षक पदाच्या एकूण रिक्त जागा - 452

हवालदार पदाच्या एकूण रिक्त जागा - 4208 

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, व अर्ज करण्याची पद्धत.

उपनिरीक्षक पदासाठी शैक्षणिक पाञता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

हवालदार - मान्यता प्राप्त संस्थेतून 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- 
हवालदार पदासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आहे तर उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा
20 ते 28 वर्षे आहे.

अर्ज शुल्क -

सामान्य प्रवर्गासाठी अर्ज शुल्क - रूपये 500 आहे तर 

SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी - रूपये 250 अर्ज शूल्क आहे.

अर्ज करण्याची पद्धत - संबधित पदभरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments