Ssc exam result maharashtra उद्या दिनांक 27 मे रोजी दूपारी 1 वाजता (SSC) दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल घोषीत होणार असून हा निकाल विद्यार्थी व त्यांच्या पालकांना कोठेही online पद्धतीने पाहता येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने असा पहा दहावीच्या परीक्षेचा निकाल.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSC) दहावीची परीक्षा नियोजनबद्धरीत्या घेण्यात आली. 'Ssc exam result maharashtra'
या वर्षी इयत्ता 10 वी ची बोर्ड परीक्षा 1 मार्च रोजी सुरू झाली आणि 26 मार्च 2024 रोजी संपली.
महाराष्ट्र एसएससी परीक्षा दोन सञामध्ये घेण्यात आली होती पहीले सञ सकाळी 11 ते 2 आणि दुसरे सञ दुपारी 3 ते 6 अशाप्रकारे दोन सञामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उद्या 27 मे रोजी दूपारी एक वाजता घोषीत होणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी व पालक या निकालाची उत्सूकतेने वाट पाहत होते.
उद्या दिनांक 27 मे रोजी निकाल घोषीत होणार असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचीं व पालकांची निकाला बाबतची आतूरता संपणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने दहावीच्या परीक्षेचा निकाल अत्यंत सोप्या पद्धतीने घरबसल्या पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्याhttps://sscresult.mahahsscboard.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचा Roll number व विद्यार्थ्यांच्या आईचे नाव टाकल्या नंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल पाहता येणार आहे.
सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या https://sscresult.mahahsscboard.in/ या वेबसाईटला क्लिक करायचे आहे.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांने त्यांचा Roll number (seat number) टाकायचा आहे.
त्यानंतर विद्यार्थ्यांने त्याच्या आईचे नाव जे परीक्षा फार्ममध्ये टाकलेले आहे. ते नाव टाकायचे आहे.
त्यानंतर view result या बटनावर क्लिक करायचे आहे.
तूमचा निकाल स्क्रीनवर दिसेल हा निकाल PDF मध्ये सेव्ह करा आणी त्याची प्रिंट काढा. "ssc exam result maharashtra"
सर्व विद्यार्थी मिञांना दहावीच्या निकालाच्या मनःपूर्वक शूभेच्छा धन्यवाद.
0 Comments