राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत कंत्राटी पद्धतीने रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्यानुसार विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची छाननी करून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती बीड पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर.
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत कंत्राटी पद्धतीने जिल्हा कार्यक्रम व्यस्थापक आयूष, वैद्यकीय अधिकारी स्त्री, (आरबीएसके) ऑडिओलॉजिस्ट, फॅसिलिटी मॅनेजर,ऑप्टोमेट्रीस्ट, फिजिओथेरपीस्ट, स्टाफ नर्स, औषध निर्माता, एंटोमालॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, लँब टेक्निशियन, इत्यादी पदाची जाहिरात दिनांक 6/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्जाची छाननी केल्यानंतर जाहिरातीमधील नमूद शैक्षणिक अहर्ता व अनुभवानुसार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आज दिनांक 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 28/6/2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय बीड या कार्यालयाच्या जाहीर सूचनेनुसार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या नूसार पुढील भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची अंतरिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादी संदर्भात आक्षेप हरकतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अंतिम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना पात्र व अपात्र बाबत काही आक्षेप व हरकती असल्यास त्यांना आपल्या आक्षेप हरकती बाबतचा अर्ज दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक ३ जुलै 2024 रोजी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड येथे प्रत्यक्ष सादर करता येणार आहे.
वेळेत आक्षेप व हरकती प्राप्त न झाल्यास पुढील भरती प्रक्रियासाठी कोणत्याही प्रकारच्या आक्षेप हरकतीचा विचार केला जाणार नाही असे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय बीड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले आहे.
सविस्तर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
0 Comments