Cabinet Meeting Maharashtra |
महाराष्ट्र शासनाच्या मंञीमंडळाची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक 30 जूलै 2024 रोजी मूंबई येथे पार पडली.
या बैठकीमध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
महाराष्ट्र राज्य मंञीमंडळ बैठक दिनांक 30 जूलै 2024.
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 'Cabinet meeting decisions'
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
संक्षिप्त मंञिमंडळ निर्णय 30 जूलै 2024
दिनांक 30 जूलै 2024 रोजीच्या मंञीमंडळ बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
संक्षिप्त मंञीमंडळ निर्णय खालीलप्रमाणे.
- विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २६८५ कोटी प्रकल्पास मान्यता. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत कर्ज.
- आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल मंजूर करण्यात आले आहे.
- महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश
- जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे शासन धोरण.
- पूर्णामाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.
- राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येणार.
- आदिम जमातीतील कुटुंबांसाठी आवास योजना राबविण्यास मंजूरी.
- ठाणे पालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन देण्या बाबत निर्णय घेण्यात आला आहे.
अशाप्रकारे हे महत्वपूर्ण निर्णय आजच्या 30 जूलै 2024 रोजीच्या मंञीमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.
0 Comments