जीएनएम (GNM) कोर्स प्रवेश प्रक्रिया 2024 - 2025 G.N.M. Admission 2024

 

Gnm Admission
Gnm Admission 

जीएनएम (GNM) कोर्स प्रवेश प्रक्रिया 2024 - 2025 G.N.M. Admission 2024

जीएनएम या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई यांच्या वतीने जीएनएम या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.

जीएनएम प्रवेश प्रक्रिया 2024 - 2025 G.N.M admission

शैक्षणिक वर्ष 2024 - 2025 मध्ये सुरू होणाऱ्या सामान्य परिचर्या प्रसविका अभ्यासक्रम तीन वर्ष प्रवेशासाठी महसूल विभाग छत्रपती संभाजीनगर मधील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून एकूण 20 जागांकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई यांच्या वतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

जीएनएम प्रवेश प्रक्रिया साठी अर्ज मिळण्याचे ठिकाण :- अधिसेविका कार्यालय स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई जिल्हा बीड.

अर्जाची किंमत खुला प्रवर्ग रुपये 200 व मागास प्रवर्ग रुपये 100

अर्ज विक्री

दिनांक 15/7/2024 ते दिनांक 20/7/2024 सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्जाची विक्री करण्यात येणार आहे.

अर्ज स्वीकृतीचा कालावधी :-  अर्ज स्विकृती - दिनांक 15 जुलै 2024 ते दिनांक 21 जुलै 2024 सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहे.

गुणवत्ता यादी प्रसिद्धीचा दिनांक :- 

दिनांक 23 जुलै 2024 रोजी सकाळी दहा वाजता गूणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

आक्षेप पूर्तता :- 

दिनांक 24/07/2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आक्षेप पूर्तता करावी लागणार आहे. 

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची तारीख :- 

दिनांक 26/7/2024 रोजी दुपारी 12 वाजता अंतिम गूणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

मूलाखत

दिनांक 29 जुलै 2024 रोजी सकाळी दहा वाजता मूलाखत घेतली जाणार आहे.

निवड यादी व प्रतीक्षा यादी :- २९ जुलै 2024 सायंकाळी सहा वाजता. 

प्रशिक्षणास रुजू होण्याचा दिनांक 1 ऑगस्ट 2024 सकाळी दहा वाजता. 

प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (आरक्षण कोट्यासाठी) तसेच बारावी उत्तीर्ण गुणपत्रिका असणे आवश्यक आहे. 

नियम व अटी प्रवेश पुस्तिकेत देण्यात आलेले आहेत. 

आरक्षण बाबत व इतर अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या https://www.srtrmca.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

तूम्हाला GNM admission 2024 हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments