बीएएमएस झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची व आनंदाची बातमी आहे.
महाराष्ट्र राज्याचे रहीवाशी असलेल्या परंतु इतर अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना आता पदव्यूत्तर आयूर्वेदीक शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या कोट्यातून संधी मिळणार आहे.
या बाबतचे निर्देश मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले आहे.
पदव्यूत्तर शिक्षण प्रवेश नियमात होणार बदल.
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ( बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. PG BAMS Education Degree
‘वर्षा’ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत आज दिनांक 3/8/2024 रोजी या संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली, या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्याच्या ८५% कोटा(शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच ७०%कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामूळे आता अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना राज्याच्या कोट्यातून पदव्यूत्तर आयूर्वेदीक शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
0 Comments