Blood donation Camp जिल्हा रुग्णालय बीड येथे ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरम यांच्यावतीने आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँक, रक्त पेढी विभागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिराला सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात रक्तदाते रक्तदान शिबिराला येत आहेत.
जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरम बीड यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन
जिल्हा रुग्णालय बीड येथे ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरम बीड यूनिट या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास सुरुवात झालेली आहे.
या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक नागरीक रक्तदान शिबिरासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत आहेत.
विशेषतः युवक वर्ग मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी जिल्हा रुग्णालय बीड येथील रक्तपेढी विभागामध्ये दाखल होत आहेत.
विशेष बाब म्हणजे या रक्तदान शिबीरामध्ये महीलांनी सूद्धा रक्तदान केले आहे.
ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरमच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.अशोक बडे, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.दिपाली कट्टे, जेपी काळे, प्रभा गालफाडे, रियाज शेख,सचिन सतकर, सागर फुलपगारे, मयूरी शिंदे आदी अधिकारी, कर्मचारी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेत आहेत.
ऑल इंडिया पायाम ए इन्सानियत फोरम यूनिट बीड या संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन या संस्थेच्या वतीने करण्यात आले असून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरम बीड यूनिटचे मोहम्मद सईद, शेख मूशीर, मोहम्मद मूस्सदिक,शाहरूख शेख यांच्यासह ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत बीड यूनिटचे कार्यकर्ते, स्वयंसेवक परीश्रम घेत असून रक्तदान शिबीरासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी संस्थेच्या वतीने पाणी, नाष्टा, बिस्कीट यांची व्यवस्था सूद्धा करण्यात आली आहे.
या रक्तदान शिबीराला एआयएमआयएम पक्षाचे नेते शफीक भाऊ शेख यांनी भेट देऊन रक्तदान शिबीरामध्ये नागरीकांनीं स्वयस्फूर्तीने सहभाग घेऊन समाजसेवे मध्ये आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.
या रक्तदान शिबीरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून हे रक्तदान शिबीर दूपारी चार वाजेपर्यंत चालू राहणार आहे.
0 Comments