नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष होणार यासह मंञीमंडळाने घेतले विविध महत्त्वाचे निर्णय

Cabinet meeting decisions maharashtra
Cabinet meeting decisions maharashtra

Cabinet meeting decisions maharashtra महाराष्ट्र शासनाच्या मंञीमंडळाची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक 13/8/2024 रोजी सह्याद्री अतिथिगृह मूंबई येथे पार पडली. 'Cabinet meeting decisions maharashtra'

या बैठकीला मूख्यमंञी एकनाथ संभाजी शिंदे, उपमूख्यमंञी देवेंद्र फडणवीस, उपमूख्यमंञी तथा अर्थमंञी अजित पवार यांच्यासह मंञीमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

या मंञीमडळ बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

या बैठकीत नगराध्यक्षाचा कालावधी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय सूद्धा घेण्यात आला आहे. या निर्णयानूसार आता नगरअध्यक्ष चा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षाचा होणार आहे.

इतरही अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले असून जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.

महाराष्ट्र मंञीमंडळ बैठक 13 August 2024

संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे.

  1. विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटी रूपयाच्या निधीस  मान्यता देण्यात आली आहे.
  2. मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लाखो नागरिकांना लाभ होणार आहे.
  3. डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना.
  4. यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील.
  5. शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन.
  6. सहा हजार कि.मी. रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता.
  7. नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष.
  8. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याप्रमाणे नगराध्यक्षांचा कालावधी वाढविणे,मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करणे यासह राज्य शासनाच्या मंञीमंडळाने आठ महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिनांक 13 August 2024 रोजीच्या मंञीमंडळ बैठकीत घेतले आहेत. 

त्याचप्रमाणे दूध विकासाला चालना देण्यासाठी सूद्धा निधी मंजूर करण्यात आला असून या निर्णयाचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

तूम्हाला "Cabinet meeting decisions maharashtra" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments