कावीळ नियंत्रणासाठी मोफत चाचणी व उपचार सूविधेचे आयोजन

Hepatitis Control programme
कावीळ नियंत्रण पंधरवाडा बीड

जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय बीड येथे हिपॅटायटिस काविळ नियंत्रण पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे.

कावीळ नियंत्रण पंधरवाडा जिल्हा रुग्णालय बीड

जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय बीड येथे जिल्हास्तरावरील नागरिकांची मोफत हिपॅटायटिस तपासणी करून मोफत औषधोपचार ही देण्यात आले आहेत. आणि अजूनही ही आरोग्य सुविधा जिल्हा रुग्णालय बीड येथे चालूच आहे.

विविध कारणामुळे सध्या हिपॅटायटिस (विविध प्रकारचे काविळ) हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी व  प्रतिबंधात्मक उपचार व लॅब टेस्ट करून या आजाराला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम (NVHCP) हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. 

या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवून हिपॅटायटिस या आजारासंबंधी जनजागृती करण्यात येते. संशयित रुग्ण शोधून त्यांची लॅब तपासणी केली जाते व लॅब तपासणीमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांना मोफत संदर्भीय सुविधा व औषधोपचार राष्ट्रीय हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत केले जातात. 

निश्चितच या आरोग्य सुविधेचा लाभ आतापर्यंत अनेक नागरिकांनी घेतला आहे परंतु अजूनही अनेक नागरिक पुरेशा माहिती अभावी या सुविधेपासून वंचित आहेत. ते खाजगी रुग्णालयात तपासणी करून उपचार घेतात त्यांना NVHCP कार्यक्रम अंतर्गत मोफत आरोग्य सूविधेचा लाभ व्हावा या उद्देशाने सध्या जिल्हास्तरावर हिपॅटाइटिस कावीळ नियंत्रण पंधरवडा हा उपक्रम चालू आहे.

त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालय बीड येथे सुद्धा हिपॅटायटिस कावीळ नियंत्रण पंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा रुग्णालय बीड येथे हा उपक्रम दिनांक 22 जुलै 2024 ते दिनांक 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत यशस्वीपणे राबविला जात आहे.

जिल्हा रुग्णालय बीड येथे या आरोग्य सुविधेचा लाभ जिल्हाभरातील व शेजारील जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी घेतला असून अजूनही हा उपक्रम जिल्हा रुग्णालय बीड येथे चालू असून जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.अशोक बडे जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालय बीड येथे कावीळ नियंत्रण पंधरवाडा हा उपक्रम बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय बीड येथील प्रयोगशाळा विभागाने विशेष परिश्रम घेतले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.दिपाली गव्हाणे, जे.पी.काळे, NVHCP प्रयोगशाळा तंत्रज्ञ नितीन हानवते, तोफीक शेख, आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments