पूणे- हवामान खात्याचा रेड अलर्ट नागरीकांनी काळजी घेण्याचे उपमूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन. Indian Weather Update

Indian Weather Update
Indian Weather Update

Indian Weather Update भारतीय हवामान खात्याने पूणे, पिंपरी - चिंचवड व सभोवतालच्या परीसरात पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून नागरीकांनीं काळजी घेण्याचे आवाहन करतानाच प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व उपायोजना करत आहे अशी माहीती उपमूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हवामान खात्याचा रेड अलर्ट

हवामान खात्याच्या रेड अलर्ट मूळे नागरीकांनीं काळजी घेण्याचे आवाहन उपमूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. Indian Weather Update

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला आहे. 

खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या धरणातून 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती शक्यता गृहित धरुन स्वत: सिंचन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली आहे.

सर्व जिल्हाधिकार्‍यांशी सुद्धा सिंचन विभाग संपर्कात असून, जिल्हाधिकार्‍यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 

सर्वच विभाग समन्वयाने स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. परीस्थीती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासन सर्व उपाययोजना व नियोजन करत आहे. Indian Weather Update

तथापि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन उपमूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments