सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) येथे 2/8/2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना’ चे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ चा शुभारंभही यावेळी करण्यात आला.
मूख्यमंञी महिला सशक्तीकरण अभियान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख महिलांना या योजनेचा लाभ मंजूर झाल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.
विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे व लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. गिताबाई जंजाळ, वर्षा बाळू पांडव, लक्ष्मीबाई पंडित, करुणा बारवाल ,संगीता अंभोरे ,मीराबाई सपकाळ, दिव्या सपकाळ, मनीषा अहिरे ,अखिला याकुब शेख ,शोभा दांडगे , मोनिका शिरसाठ, वत्सला जाधव ,वंदना काकडे, अलकाबाई पगारे, रुकसाना दिलावर तडवी, कविता अहिरे, कल्पना चव्हाण, नंदा पालोदकर या महिला लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रातिनिधिक स्वरुपात लाभ देण्यात आला.
या मेळाव्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठीचा दिव्या रामदास सपकाळ या बहिणीचा अर्ज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला, त्या अर्जावर तिची सही घेऊन तो जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे मंजूरी प्रक्रियेसाठी सुपुर्द केला.
या कार्यक्रमास महिला भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती होती. अनेक भगिनी पारंपारिक वेषभूषा करुन या कार्यक्रमात सहभागी झाल्या. व्यासपीठावर जाऊन अनेक भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून त्यांच्याशी संवाद साधला.
छत्रपती संभाजीनगर विमानतळापासून ते सिल्लोड येथे कार्यक्रमस्थळी येईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रस्त्यात लागणाऱ्या प्रत्येक गावात स्वागत करण्यात आले.
महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण करुन त्यांना राखी बांधली. सिल्लोड शहरात झालेल्या रोड शो मध्ये स्थानिकांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.
0 Comments