Mahanagar palika jalgaon bharti जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
जळगाव मनपा भरती
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आरोग्य विभाग जळगाव महानगरपालिका अंतर्गत जळगाव शहरातील विविध आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असलेल्या पदांची पदभरती करण्या करिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रता धारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. Nuhm Jalgaw Job Vacancy
रिक्त असलेल्या पदांचा तपशील :-
स्टाफ नर्स पूरूष, स्टाफ नर्स महिला, MPW पूरूष, या तीन संवर्गातील एकूण 45 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
अर्ज करण्याचा कालावधी व पत्ता
दिनांक 12 ऑगस्ट 2024 ते दिनांक 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत ऑफलाइन पद्धतीने पोस्टाद्वारे अथवा स्वहस्ते अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 'Mahanagar palika jalgaon bharti'
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता :-
वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर जळगाव - 425001 या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
हे अर्ज वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहूनगर जळगाव 425001 या पत्यावर बाय हॅन्ड, पोस्ट, स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, किंवा कुरिअरने बंद लिफाफ्यात विहित मूदतीत प्राप्त झाले तरच त्या अर्जाचा विचार करण्यात येईल.
भरती प्रक्रिया शूल्क
अराखीव (खूला) प्रवर्गासाठी रुपये 500 तर राखीव प्रवर्गासाठी रुपये 350आहे.
हे शूल्क डिमांड ड्राफ्ट स्वरूपात स्वीकारण्यात येणार असून डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचा असणे आवश्यक आहे.
Corporation integrated health and family welfare society jalgaon या नावाने डीडी काढून तो अर्जासोबत जोडायचा आहे. Mahanagar palika jalgaon bharti
अर्जा सोबत सादर करावयाचे कागदपत्रे
अर्जासोबत सर्व शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, वयाचा दाखला, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे चालू वर्षाचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे स्वसाक्षांकीत करून जोडायची आहेत.
सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमूना येथे क्लिक करा.
तूम्हाला "Mahanagar palika jalgaon bharti" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments