Mukhyamantri mazhi ladki bahin yojana madat kendra महिलांना मूख्यमंञी माझी लाडकी बहीण योजना या योजने संदर्भात काही अडचणी व समस्या असल्यास यासाठी बीड शहरामध्ये तहसील कार्यालया बाहेरच्या प्रांगणात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
मूख्यमंञी माझी लाडकी बहीण योजना बीड विधानसभा क्षेञ समीतीच्या आढावा बैठकीत या बाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहीती.
मूख्यमंञी माझी लाडकी बहीण योजना मदत केंद्र होणार स्थापन.
मूख्यमंञी माझी लाडकी बहीण योजना मदत केंद्र बीड |
आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी तहसील कार्यालय बीड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक बीड नगर परीषदेचे नगरसेवक तथा मूख्यमंञी माझी लाडकी बहीण योजना समीतीचे तालूका अध्यक्ष अमर नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 'Mukhyamantri mazhi ladki bahin yojana madat kendra'
या आढावा बैठकीला, समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार बीड श्री चंद्रकांत शेळके, यांच्यासह शासकीय सदस्य, अशासकीय सदस्य, तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळक, सचिन जाधव, पालिका गटनेते फारुख पटेल, नगरसेवक सर्वश्री प्रभाकर पोपळे, भैय्यासाहेब मोरे, गणेश तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकी मध्ये मूख्यमंञी माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील विविध मूद्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली योजनेचा लाभ प्रत्येक पाञ लाभार्थीनां कसा मिळेल या बाबत उपाययोजना सूचविण्यात आल्या.
बीड जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जापैकी सर्वाधिक लाभार्थ्यांचे अर्ज बीड तालूक्यातून प्राप्त झाले आहेत.
68665 अर्ज हे बीड तालुक्यातून आले आहेत. यापैकी 66975 अर्ज मंजूर करण्यात आले असून 83 अर्ज नामंजूर झालेले आहेत. अर्जातील त्रुटीमुळे 1516 अर्ज तात्पुरते नामंजूर करण्यात आले आहेत.
त्रुटीमुळे तात्पुरते ना मंजूर करण्यात आलेल्या अर्जांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून त्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी बीड विधानसभा क्षेत्र समिती प्रयत्नशील असेल असा निर्णय सूद्धा या बैठकीत घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे या योजने संदर्भातील अडचणी व समस्या निवारणासाठी मदत केंद्र स्थापन करण्या बाबतचा महत्वपूर्ण निर्णयसूद्धा या बैठकीत घेण्यात आला आहे.
या महत्वपूर्ण निर्णयानूसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बीड विधानसभा क्षेत्रातील अंतिम घटकातील, बहिणींपर्यंत पोहोचविण्या करिता तहसील कार्यालया बाहेरच्या प्रांगणात मंडप टाकून लाभार्थ्या बहिणींसाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
या मदत केंद्राचा शुभारंभ देशाच्या स्वातंत्र्य दिनी उद्या दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता राज्याचे कृषीमंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.
तूम्हाला "Mukhyamantri mazhi ladki bahin yojana madat kendra" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments