Amravati municipal corporation requirements अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अमरावती मनपा भरती
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 15 वा वित्त आयोग अंतर्गत अमरावती शहरातील विविध आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असलेल्या पदांची पदभरती करण्या करिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रता धारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. Amravati municipal corporation requirements
आरोग्य वर्धिनी केंद्राचे रूपांतर आता आयूष्यमान आरोग्य मंदीर असे झाले असून त्याप्रमाणे कार्यान्वित झाल्यावरच उमेदवारांना नियूक्ती आदेश देण्यात येणार आहे.
स्टाफ नर्स व MPW या पदांसाठी ही पदभरती होणार आहे.
रिक्त असलेल्या पदांचा तपशील
स्टाफ नर्स संवर्गातील एकूण 22 तर MPW पूरूष संवर्गातील 22 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
नियूक्तीचे ठिकाण - अमरावती.
वेतन - स्टाफ नर्स पदासाठी वेतन रूपये 20000 आहे तर MPW पूरूष या पदासाठी वेतन रूपये 18000 आहे.
अर्ज करण्याचा कालावधी व पत्ता
दिनांक 3/8/2024 ते दिनांक 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत ऑफलाइन पद्धतीने समक्ष अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता अमरावती महानगर पालीका आरोग्य विभाग आवक जावक कक्ष पंजाब नॅशनल बँकेचा वरचा मजला निलकमल चौक अमरावती. या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज समक्ष स्वीकारले जाणार आहेत.
अर्जाची छाननी केल्यानंतर उमेदवारांची पाञ व अपाञ यादी इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल अमरावती महानगर पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. www.amravaticorporation.in या वेबसाईटवर पाञ व अपाञ यादी इत्यादी बाबतचा तपशिल प्राप्त झालेल्या सर्व अर्जाच्या छाननीनंतर प्रसिद्ध केला जाणार आहे.
अर्जा सोबत सादर करावयाचे कागदपत्रे
अर्जासोबत सर्व शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, वयाचा दाखला, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र (स्टाफ नर्स पदासाठी), नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे चालू वर्षाचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे स्वसाक्षांकीत करून जोडायची आहेत.
0 Comments