NHM Job Vacancy जिल्हा परिषद ठाणे येथे राष्ट्रीय आयूष अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
या भरती प्रक्रिये बाबतची पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.
जिल्हा परिषद ठाणे भरती
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग ठाणे साठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे.
ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त असलेल्या डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष, प्रोग्राम असिस्टंट आयुष, योगा इन्स्ट्रक्टर, एन्टोमोलॉजिस्ट, प्रोग्राम हेल्थ स्पेशालिस्ट, लॅब टेक्निशियन, मेडिकल ऑफिसर, सोशल वर्कर, ऑडिओलॉजिस्ट, फार्मासिस्ट, इत्यादी रिक्त असलेल्या पदांकरिता राबविण्यात येत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते.
या प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर उमेदवारांची तात्पुरती पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आली होती व या संदर्भात उमेदवारांच्या काही आक्षेप, हरकती असल्यास त्याबाबत उमेदवारांना आक्षेप,हरकती नोंदविण्या करिता 12 मार्च 2024 ते 14 मार्च 2024 या कालावधीमध्ये उमेदवारांकडून आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या होत्या.
या हरकतीची पूर्तता केल्यानंतर आता उमेदवारांची अंतिम पात्र व अपात्र गुणवत्ता यादी तसेच मेरीट यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मेरीट यादी मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांना १:३ या प्रमाणात समूपदेशना करिता बोलविण्यात येणार आहे समुपदेशना संदर्भातील सर्व सूचना नंतर या zpthane.maharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उमेदवारांची पात्र व अपात्र, अंतिम गुणवत्ता यादी व मेरिट यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
0 Comments