Nhm ZP Hingoli Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी आरोग्य विभागामध्ये 15 वा वित्त आयोग, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, व राष्ट्रीय आयूष मिशन अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्रता धारक व इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती हिंगोली
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), 15 वा वित्त आयोग, व राष्ट्रीय आयूष मिशन अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असलेल्या पदांची पदभरती करण्या करिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रता धारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 'Nhm Hingoli Job Vacancy'
रिक्त असलेल्या पदांचा तपशील
वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, एम.पी.डब्ल्यू, अकाउटंट, लँब टेक्निशियन, कार्डिओलॉजिस्ट, एन्टोमोलॉजिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, बजेट अँड फायनान्स ऑफिसर, फार्मासिस्ट, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, पियर सपोर्टर, इत्यादी 31 संवर्गातील एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी आरोग्य विभाग हिंगोली यांच्या वतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
अर्ज करण्याचा कालावधी व पत्ता
दिनांक 12 ऑगस्ट 2024 ते दिनांक 27 ऑगस्ट 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता
NHM कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परीषद हिंगोली या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारले जाणार आहेत. Nhm ZP Hingoli Bharti
भरती प्रक्रिया शूल्क
भरतीचे शूल्क अराखीव (खूला) प्रवर्गासाठी रुपये 150 तर राखीव प्रवर्गासाठी रुपये 100 आहे.
हे शूल्क डिमांड ड्राफ्ट स्वरूपात स्वीकारण्यात येणार असून District integrated health and family welfare society Zp hingoli या नावाने डिमांड ड्राफ्ट (DD) काढावा.
डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचा असणे आवश्यक आहे.
अर्जा सोबत सादर करावयाचे कागदपत्रे
अर्जासोबत सर्व शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, वयाचा दाखला, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र लागू असलेल्या पदासाठी, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, टीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे चालू वर्षाचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे स्वसाक्षांकीत करून जोडायची आहेत.
सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमूना येथे क्लिक करा.
तूम्हाला "Nhm ZP Hingoli Bharti" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments