जागतिक दर्जाच्या खेळाडूंना हरवून फायनलमध्ये धडक पण वजन जास्त भरल्यामूळे विनेश फोगाट अपाञ

Vinesh phogat paris olympics
Vinesh phogat paris olympics 

Vinesh Phogat Paris Olympics Disqualification पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics)50 किलो वजनी गटात अंतिम सामन्यापूर्वीच भारताची कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

एकाच दिवसात जागतिक स्तरीय तीन कुस्तीपटूंचा पराभव करणारी विनेश फोगाट फक्त 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामूळे ऑलिंपिक स्पर्धेतून अपात्र झाली आहे यामूळे आज विनेश सोबत संपूर्ण देश भावूक झाला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक विनेश फोगाट अपाञ

विनेश फोगाट पन्नास किलो वजन गटांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत होती. कूस्ती या खेळामध्ये ऑलिंपिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ती पहिलीच महिला ठरली होती परंतू 50 कि.ग्रॅ. पेक्षा फक्त 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले आहे.

अंतिम सामन्याच्या पहिल्या रात्री तिचे वजन 52 किलो ग्रॅम भरले होते यामुळे तिने संपूर्ण रात्र जागून काढली, वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, रात्रभर व्यायाम केला व कोणत्याही प्रकारचा आहार घेतला नाही रात्रभर वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले व तिचे वजन कमीही झाले परंतु ऐनवेळी फायनल सामन्यापूर्वी

तिचे वजन फक्त शंभर ग्रॅमने जास्त भरले यामुळे तिला ऑलम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले असून आता या वजन गटांमध्ये फक्त सुवर्णपदक आणि कांस्यपदक देण्यात येणार आहे.

कारण विनेश फोगाटला अपाञ करण्यात आल्यामूळे अंतिम सामना होणार नाही व यामूळे अमेरिकेच्या खेळाडूला अंतिम सामना न खेळता सूवर्णपदक मिळणार आहे.

विनेश फोगाटला अपात्र ठरविण्याच्या निर्णया विरोधात भारतीय संघाने अपील केले होते परंतु ऑलम्पिक फेडरेशनने हे अपील फेटाळले यामुळे भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट अंतिम सामन्यात अपात्र ठरली. 

विनेश फोगाट अपात्र ठरल्याची बातमी तिला कळताच तिची प्रकृती अस्वस्थ झाली व तिला पॅरिस येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. अंतिम सामन्यात पोहचूनही अपाञ ठरल्यामूळे विनेश फोगाटसह संपूर्ण भारत देश भावुक झाला आहे.

Post a Comment

0 Comments