Railway Bharti भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
भारतीय रेल्वेच्या पॅरामेडिकल विभागामध्ये ही भरती होणार आहे.
यानुसार पॅरामेडिकल विभागातील विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. एकूण 1376 जागासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
रेल्वे पॅरामेडीकल भरती 2024
भारतीय रेल्वेमध्ये पॅरामेडिकल विभागाच्या विविध संवर्गातील एकूण 1376 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून 17 ऑगस्ट 2024 पासून यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. Railway Bharti
अर्ज करण्याची शेवट दिनांक 16 सप्टेंबर 2024 आहे.
म्हणजेच 17 ऑगस्ट 2024 ते 16 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये रेल्वे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. RRB 2024
भरती प्रक्रियेचे स्वरूप
संगणक आधारित परीक्षा (computer based test) कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय परीक्षण (Medical examination) या प्रक्रियेद्वारे ही रेल्वे भरतीची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
रेल्वे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संगणक आधारित परीक्षा म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी व त्यानंतर वैद्यकीय परीक्षण होणार आहे याद्वारे उमेदवारांची निवड प्रक्रिया भारतीय रेल्वे द्वारे राबविण्यात येणार आहे.
रिक्त असलेल्या पदांचा तपशील
भारतीय रेल्वेमध्ये या खालील पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भारतीय रेल्वेच्या पॅरामेडिकल विभागांमध्ये डायटिशियन या पदाच्या 5 जागा रिक्त आहेत.
- नर्सिंग सुप्रीटेंडेंट पदाच्या एकूण 713 रिक्त जागा आहेत.
- ऑडिओ लॉजिस्ट अँड स्पीच थेअरपीस्ट या पदाच्या 04 रिक्त जागा आहेत.
- केमिकल फिजिकोलॉजिस्ट या पदाच्या 07 रिक्त जागा आहेत.
- डेंटल हायजिनिस्ट पदाच्या 03 जागा रिक्त आहेत. डायलिसिस टेक्निशियन पदाच्या 20 जागा रिक्त आहेत.
- हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3 पदाच्या 1926 जागा रिक्त आहेत.
- लॅबोरेटरी सुप्रीटेंडंट ग्रेड 3 पदाच्या एकूण 70 जागा रिक्त आहेत.
- परफ्यूशनिस्ट पदाच्या 02 जागा रिक्त आहेत.
- फिजिओथेरपीस्ट ग्रेड 3 पदाच्या 20 जागा आहेत.
- occupational therapist 02
- कॅथलॅब टेक्निशियन 02
- फार्मासिस्ट entry grade 246
- रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन ६४
- स्पीच थेरपीस्ट 01
- कार्डियक टेक्निशियन 04
- Optometrist 04
- ईसीजी टेक्निशियन 13
- लायब्ररी असिस्टंट ग्रेड (2) 94
- फिल्ड वर्कर 19
अशा प्रकारे एकूण 1376 जागा रिक्त आहेत या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
विविध पदासाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
- डायटिशियन 18 ते 36 वर्ष.
- नर्सिंग सुपरीटेंडेंट 20 ते 43 वर्षे.
- डायलिसिस टेक्निशियन 20 ते 36 वर्ष
- हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर 18 ते 36 वर्षे.
- लँबोरेटरी सुपरीटेंडेंट 18 ते 36 वर्ष
- फिजिओथेरपीस्ट ग्रेड (2) 18 ते 36 वर्षे.
- आक्युपेशनल थेरेपीस्ट 18 ते 36 वर्ष.
- Cath Lab technician 18 ते 36 वर्ष.
- फार्मासिस्ट २० ते ३८ वर्षे.
- रेडीओग्राफर एक्सरे टेक्निशियन 19 ते 36 वर्षे.
- स्पीच थेअरपिस्ट 18 ते 36 वर्ष.
- कार्डीयाक टेक्निशियन 18 ते 36 वर्षे.
- ऑप्टोमेट्रीस्ट 18 ते 36 वर्षे.
- ईसीजी टेक्निशियन 18 ते 36 वर्षे.
- लायब्ररी असिस्टंट 18 ते 36 वर्ष.
- फिल्ड वर्कर 18 ते 33 वर्ष.
- एससी, एसटी उमेदवारांना वयोमर्यादे मध्ये पाच वर्षाची सवलत आहे तर ओबीसी नॉन क्रिमीलेयर उमेदवारांना वयोमर्यादे मध्ये तीन वर्षे सवलत आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक 17 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे. ही लिंक 16 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे.
जनरल, ओबीसी, आणी EWS प्रवर्गासाठी भरती शूल्क रुपये 500 आहे.
परीक्षेचे स्वरूप
परीक्षा संगणक आधारित म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. ही परीक्षा निगेटिव्ह मार्कींग पद्धतीने होणार आहे म्हणजेच प्रत्येकी एका चुकीच्या प्रश्नासाठी 0.25 गूण वजा केले जाणार आहेत प्रश्नांची उत्तरे न दिलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गूण (मार्क) वजा केले जाणार नाहीत.
शंभर गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा होणार आहे.
सविस्तर जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
17 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक 17 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे.
17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments