जिल्हा परिषद आरोग्य विभाग गडचिरोली येथे विविध पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र व इच्छुक उमेदवाराकडून गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.
जिल्हा परिषद भरती गडचिरोली
पंधरावा वित्त आयोग अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर तालुका सार्वजनिक आरोग्य पथक (Block Public Health Unit) उभारण्याकरिता एंटोमोलोजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ही पदे भरण्याकरिता अर्हता प्राप्त व इच्छुक उमेदवारांकडून फक्त गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ZP bharti maharashtra in marathi
रिक्त असलेल्या पदांचा तपशील
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर तालुका सार्वजनिक आरोग्य पथक उभारण्याकरिता एंटमोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ही पदे भरण्यात येणार आहेत.
यानुसार एंटोमोलोजिस्ट या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट पदाच्या सुद्धा 12 जागा भरण्यात येणार आहेत.
तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
भरती शुल्क
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अथवा ऑफलाइन पद्धतीने शूल्क भरावे लागणार आहे.
भरती प्रक्रियेचे शुल्क राखीव (मागास) प्रवर्गासाठी रुपये 100 आहे तर (अराखीव) खुला प्रवर्गासाठी भरतीचे शुल्क रुपये 150 आहे.
ही रक्कम इंटरनेट बँकिंग, फोन पे, गुगल पे, अथवा ऑफलाइन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहे चेक अथवा डिमांड ड्राफ्ट द्वारे कोणत्याही प्रकारचे शुल्क स्वीकारले जाणार नाही.
रक्कम भरल्यानंतर प्राप्त होणारा व्यवहारीक क्रमांक (ट्रांजेक्शन आयडी) ऑनलाइन अर्ज भरतांना नोंदविणे व व्यवहाराचा स्क्रीन शॉट Online अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे त्यामुळे उमेदवारांनी सर्वप्रथम भरतीची रक्कम बँकेत जमा करावी त्यानंतरच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. सदरील व्यवहाराची स्क्रीन शॉट, व प्रिंट काढून ते स्वतः जवळ भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी ठेवावी असे जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
इच्छुक व अर्हताधारक उमेदवारांकडून google फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची लिंक 22 ऑगस्ट रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत चालू राहणार आहे.
गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेलवर ऑटो जनरेटेड अर्जाची प्रत प्राप्त होईल सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांनी त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति सेल्फ अटेस्टेड (स्वसाक्षाकींत करून) अर्जासोबत जोडून सदर अर्ज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत निवासस्थान क्रमांक बी 2 स्लॅब कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली या पत्त्यावर बंद लिफाप्या मध्ये त्यावर पदाचे नाव व प्रवर्ग स्पष्टपणे नमूद करून समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने (रजिस्टर पोस्ट) सादर करावेत विहित मूदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
सविस्तर जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments