ईद-ए-मिलादच्या सुट्टीमध्ये बदल Public holiday date change 

Public Holiday date change
Public Holiday date change 

ईद-ए-मिलादच्या सुट्टीमध्ये बदल Public holiday date change 

ईद-ए-मिलाद या सणाच्या सुट्टीमध्ये बदल करण्यात आला असून या बाबतचा निर्णय जिल्हाधिकारी बीड यांनी घेतला असून या बाबतची अधिसूचना आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीडच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

जाणून घेऊ या याबाबत सविस्तर माहिती.

ईद-ए-मिलादच्या सुट्टीमध्ये बदल

सध्या गणपती उत्सव सुरू आहे. अशातच ईद ए मिलाद हा सण सुद्धा 16 सप्टेंबर 2024 रोजी आहे. तर गणपती विसर्जन 17 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. 

त्या अनुषंगाने सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतूने बीड जिल्ह्यासाठी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 करिता घोषित करण्यात आलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 या दिवशी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी बीड यांनी घेतला आहे.

 राज्य शासनाने नुकतेच त्या त्या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले होते त्याचप्रमाणे यापूर्वी वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना व राजपत्राच्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी यांना सुट्टी मध्ये बदल करण्याचा अधिकार असून त्यानुसार या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी तसेच सामाजिक सलोखा व कायदा व सूव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतूने बीड जिल्ह्यासाठी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 करिता घोषित केलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बूधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 या दिवशी जाहीर केली आहे. Public holiday date change 

Post a Comment

0 Comments