Union Cabinet Meeting Decisions |
Cabinet meeting decisions देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बूधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय मंञीमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
केंद्र शासन मंञीमंडळ बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंञीमंडळ बैठकीत पंतप्रधान अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजना (PM Asha) या 35 हजार कोटी रूपयाच्या योजनेला मंजूरी देण्यात आली आहे.
या योजनेसह रब्बी हंगामासाठी पोषणमूल्य आधारीत रासायनिक खतांच्या अनूदानासाठी 24 हजार कोटी रूपयेही मंजूर करण्यात आले आहेत.
येणाऱ्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना स्वस्तदरात पीक पोषक म्हणजेच खते पुरविण्यासाठी सरकारने बुधवारी फॉस्फेट आणि पोटॅश (पी अँड के) असलेल्या खतांवर 24,474.53 कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली आहे.
या निर्णयाचा उद्देश शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणारी आणि वाजवी किंमतीत खतांची उपलब्धता करून देणे हा आहे.
सरकार खत उत्पादक व आयातदारांद्वारे शेतकऱ्यांना फॉस्फेट व पोटँशच्या 28 प्रकारांची खते सबसिडीच्या दरात उपलब्ध करून देणार आहे.
वन नेशन वन इलेक्शन One nation one election
केंद्रीय मंञीमंडळाने वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला सूद्धा मान्यता दिली आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समीतीने वन नेशन वन इलेक्शन बाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला होता.
या प्रस्तावाला केंद्रीय मंञीमंडळाने मंजूरी दिली असून येणाऱ्या हिवाळी संसदिय अधिवेशना मध्ये बिल पास करून कायदा करण्यात आल्यानंतर देशात एकाचवेळी one nation one election निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
0 Comments