जिल्हा रूग्णालय बीड येथे रक्ताचा तूटवडा भासत असून गरजू रूग्ण रक्त पिशवी मिळविण्या पासून वंचित राहत आहेत.
या संदर्भात बीड जिल्ह्याचे जिल्हाशल्यचिकीत्सक यांनी जास्तीत जास्त नागरीकांनीं रक्तदान करून सामाजिक उपक्रमा मध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी नागरीकांना केले आहे.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सोयीस्कर व आरामदायक वाटावे, रम्य वातावरणात रक्तदान करता यावे यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय बीड येथे रक्तदान भवन उभारण्यात आले आहे.
जिल्हा रूग्णालय बीड येथे रक्तदान भवन स्थापन जास्तीत जास्त नागरीकांनी रक्तदान करावे डॉ.अशोक थोरात यांचे आवाहन
बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याने जिल्हा रुग्णालयात रक्त पेढीमध्ये रम्य वातावरणात रक्तदान करण्यासाठी रक्तदान भवन तयार करण्यात आले असून त्याठिकाणी सेल्फी पॉइंट सूद्धा उभारण्यात आला आहे.
त्याचे उद्घाटान बीड जिल्ह्याचे,जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी रक्तदान करून केले आहे.
या उद्घाटन प्रसंगी त्यांच्यासोबत इतरही सहा जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे.
जिल्हा रूग्णालय बीड येथील रक्तपेढी (ब्लड बँक) मध्ये रक्ताचा तूटवडा असल्याने जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे करावे असे आवाहन बीड जिल्ह्याचे जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले आहे.
0 Comments