संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना होणार लागू राज्य शासनाचा निर्णय

संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना
संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना

महाराष्ट्र राज्य हे साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्वपूर्ण व मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन करणारे राज्य आहे. साखर उत्पादन करण्याच्या संदर्भात ऊसतोड कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. 

ऊसतोड कामगारांसाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला असून आता ऊसतोड कामगारांना विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. यासाठी राज्य शासनाने विमा योजना लागू करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना.

दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वपूर्ण 33 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत त्यापैकीच एक मोठा निर्णय ऊसतोड कामगारासाठी घेण्यात आला आहे.

ऊसतोड कामगारांना आता विमा कवच प्राप्त होणार असून ऊसतोड कामगारांना व त्यांच्या कूटूंबियांना विमा संरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने मंञीमंडळ बैठकीत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत 'संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना' लागू करण्यास मान्यता दिली असून, ऊसतोड कामगारांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे. 

सध्याचे कृषीमंञी धनंजय मूंडे हे तत्काळीन सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांनी या योजनेला प्रस्तावित केले होते. या योजनेस मूर्त स्वरूप मिळत असल्याचे पाहून या योजनेत माझाही वाटा असल्याने स्व.मुंडे साहेबांच्या स्वप्नपूर्तीचा मीही भागीदार असल्याचा एक वेगळाच आनंद आहे असे मत कृषीमंञी धनंजय मूंडे यांनी व्यक्त केले आहे. 

या योजनेच्या माध्यमातून सुमारे 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम, सुमारे दीड ते दोन लाख पशुधनाचा आणि मजुरांच्या झोपडीलाही विम्याचे कवच मिळणार आहे. 

मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंञीमंडळ बैठकीत विविध महत्त्वाच्या 33 निर्णयासह या संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना या विमा योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. 

त्याचप्रमाणे रमाई व शबरी आवास योजनेच्या अनूदानात वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय सूद्धा या मंञीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments