महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून महायूतीला रेकॉर्डब्रेक विजय मिळाला आहे तर महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव झाला आहे.
महायूतीने एकूण 230 जागा जिंकल्या असून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
राजधानी मूंबईत वेगवान घडामोडी घडत असून महायूतीच्या तिन्ही प्रमूख पक्षाची आमदाराची बैठक संपन्न झाली असून विधिमंडल गटनेता निवडण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे.
मूख्यमंञी कोण होणार या बाबतीतही चर्चा केली जात असून एकनाथ शिंदे सूरवातीचे अडीच वर्ष मूख्यमंञी पदासाठी आग्रही आहेत अशी माहीती मिळत आहे तर राज्यातील भाजप नेते व कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मूख्यमंञी व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत आहेत तसेच राष्ट्रीय स्वयसेवक संघ देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनूकूल असल्याची माहीती मिळत आहे.
आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक पार पडली विधिमंडळ नेता निवडण्यासाठी ही बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते बैठकीत सर्वानूमते अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भूजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला ते म्हणाले की विधिमंडळ नेतेपदी सर्वानूमते अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली आहे त्यांना पञकारांनी मूख्यमंञी संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमची सहमती आहे.
0 Comments