विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पाडणार आहे.
ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षण विभागासह इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शिक्षकांच्या निवडणूक ड्युटी मुळे शाळा भरवणे शक्य होणार नाही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेण्याबाबतचे निर्देश महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीमुळे शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी शाळेला सुट्टी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 18, 19, व 20 नोव्हेंबर 2024 या तीन दिवशी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाकडे सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र शासनाने खालील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणे बाबत आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निगर्मित कराव्यात असे निर्देश महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांनी याबाबतचे पत्र आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिले आहे.
0 Comments