Cabinet Meeting Decisions Maharashtra मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या मंञीमंडळाची बैठक पार पडली या मंञीमंडळ बैठकीला उपमूख्यमंञी एकनाथ शिंदे, उपमूख्यमंञी अजितदादा पवार यांच्यासह मंञीमंडळातील सदस्य उपस्थित होते.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. Cabinet Meeting Decisions Maharashtra
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) खालीलप्रमाणे :
१) शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-२०१४ मध्ये सुधारणा करणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)
२) १ एप्रिल २०२५ पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य
३) महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करणार (सामान्य प्रशासन विभाग)
- शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल
- मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणे, मा. राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती इत्यादी बाबींसंदर्भात तरतुदी.
1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्यासह इतर महत्वपूर्ण निर्णय मंञीमंडळ बैठकीत घेतले आहेत.
0 Comments