राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
30 जानेवारीला पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे या बैठकीसाठी ते बीड जिल्ह्यात येणार आहेत.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे देखील 30 जानेवारीला बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.
उपमूख्यमंञी अजितदादा पवार बीड जिल्हा दौऱ्यावर
उपमूख्यमंञी अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच बीड जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत.
गुरुवारी दिनांक 30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे .
या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात बीड जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे.
30 जानेवारी रोजी सकाळी 10:00 वाजता ही बैठक होईल.
या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
प्रत्येक विभागाचे प्रस्ताव किती, प्रलंबित प्रश्न कोणते? प्रलंबित राहण्याची कारणे काय? यावर चर्चा करण्यात आली .
दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील .
या संदर्भात राज्यात बैठकांचा सपाटा सुरू असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा महत्त्वाचा मानला जात आहे .
0 Comments