राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंञी प्रकाश अबिटकर यांनी आरोग्य सेवा आयूक्तालय येथे आरोग्य सेवेच्या कामाचा आढावा घेतला या आढावा बैठकीत त्यांनी विविध महत्त्वाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
कामात अनियमितता करू नये मी आरोग्य संस्थाना भेटी देणार - आरोग्यमंञी
सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य व विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.
राज्यातील सर्व परिमंडळातील आरोग्य सेवेची आढावा बैठक आरोग्य सेवा आयूक्तालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर म्हणाले, आरोग्य संस्थाच्या भेटी वेळी रुग्णालयातील स्वच्छता, सुरक्षा, परिसर स्वच्छता, रुग्णाच्या आहाराचा दर्जा, रुग्णांना मिळणारी वागणूक, औषधांची उपलब्धता, कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन या बाबींची काटेकोर पाहणी करण्यात यावी. आरोग्य संस्थांच्या कामात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. वेळेनुसार मी स्वतःदेखील आरोग्य संस्थांना भेटी देईन, असे निर्देश आरोग्यमंञी प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
0 Comments