केंद्र शासनाने जाहीर केले पद्म पूरस्कार

Padma Awards
Padma Awards

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने पद्म पूरस्कार जाहीर केले आहेत. 

Padma Awards 2025 declared 

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पद्मपुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक,अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.  

त्याचप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, गायिका आश्विनी भिडे देशपांडे, निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली, वनसंवर्धक चैत्राम पवार, होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक रणेंद्र मजुमदार, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्चुत पालव, बँकर अरुंधती भट्टाचार्य तसेच कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुभाष खेतुलाल शर्मा यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

या सर्वांचे मूख्यमंञी देवेंद्र फडणवीस, उपमूख्यमंञी एकनाथ शिंदे, उपमूख्यमंञी अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे व आनंद व्यक्त केला असून ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments