राज्यात प्रथमच 'राज्य आरोग्य धोरण' सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची महत्वपूर्ण बैठक मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती सार्वजनिक आरोग्यमंञी प्रकाश अबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. State Health Policy Maharashtra
राज्य आरोग्य धोरण महाराष्ट्र
सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरा- मोहरा बदलणारे, राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व लोकाभिमुख करणारे महाराष्ट्राचे स्वतंत्र “आरोग्य विषयक धोरण” (state health policy) बनविण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आरोग्यमंञी प्रकाश अबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भविष्यात महाराष्ट्रात 'आरोग्य पर्यटन' ही संकल्पना (Medical Tourisum) रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही दिल्या यावेळी आरोग्यमंञी महोदय यांनी दिल्या.
त्याचप्रमाणे दिव्यांगाबाबत महत्वपूर्ण निर्णय आरोग्यमंञी यांनी घेतला आरोग्यमंञी यांनी दिव्यांगाची विशेष काळजी घेत दिव्यांग व्यक्तींना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांना जवळच्या ठिकाणी, सुलभतेने दिव्यांग प्रमाणपत्रे मिळावीत, यासाठी ग्रामीण रुग्णालय (50 खाटा) व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर शिबीर आयोजित करून निकषानुसार तपासणी करून प्रमाणपत्रे वितरित करण्याबाबत सूचना दिल्या. दिव्यांगांना बोगस प्रमाणपत्रे देणारे व त्याद्वारे शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंञी प्रकाश अबिटकर यांनी दिले आहेत.
वैद्यकीय बिल प्रतीपुर्तीचे प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे प्रलंबित राहतात. त्यामुळे सर्व वैद्यकीय बिले दप्तरी दाखल झाल्यापासून 7 दिवसात मार्गी लावण्याचे निर्देश आरोग्यमंञी यांनी दिले.
दि. 04 फेब्रुवारी 2025 रोजी जागतिक कर्करोग दिन राज्य, जिल्हा स्तरावर व सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्रभावीपणे राबविण्याच्या तसेच वाढते मधुमेहाचे रुग्ण पाहता आवश्यक तपासणी करुन उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्यमंञी यांनी दिल्या. महिला कर्करोग रुग्णांसाठी तपासणी शिबिरे राबवावी व त्यांना आवश्यक ते योग्य उपचार विनामूल्य उपलब्ध करुन द्यावेत असे निर्देश बैठकीत आरोग्यमंञी यांनी दिले.
स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी या योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी, आरोग्य खाते अंतर्गत शासकीय अधिकारी यांच्या सुरु असलेल्या चौकशी प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा व योग्य असेल त्यांना न्याय द्यावा, अयोग्य असेल त्याला शास्ती करा, प्रकरणे प्रलंबित ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश यावेळी आरोग्यमंञी यांनी दिले.
आरोग्य सेवेपासून कोणताही नागरिक वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य संस्थामधील 'ब' वर्गातील डॉक्टरांच्या रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्यमंञी यांनी दिल्या.
या बैठकीला सहसचिव विजय लहाने, अशोक अत्राम, उपसचिव शिवदास धुळे, दिपक केंद्रे यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 Comments