केंद्र शासनाने काल दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी देशातील सर्व राज्यांना कर परतावा निधी जारी केला आहे. Tax Devolution
विकास आणी कल्याणाशी संबंधित खर्चानां वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने राज्यांना या निधीचे वाटप केले आहे.
केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
केंद्राने राज्यांना एकूण 1 लाख 73 हजार 030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केले असून महाराष्ट्राला एकूण 10930.31 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार मानले आहेत.
केंद्र सरकारने काल राज्य सरकारांना त्यांच्याकडे जमा झालेल्या कराच्या रकमेतून 1 लाख 73 हजार 030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले.
डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण 89,086 कोटी रुपये इतके होते.त्या तुलनेत जानेवारी महिन्यातील रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने राज्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात असल्याची माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या निधीपैकी सर्वाधिक निधी उत्तर प्रदेशला देण्यात आला आहे.
त्या नंतर बिहारला 17403.36 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
मध्य प्रदेश या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असून मध्य प्रदेशला 13582.56 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
यानंतर चौथा क्रमांक महाराष्ट्राचा येतो, आपल्या महाराष्ट्र राज्याला 10930.31 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ राजस्थानला देखील चांगला निधी मिळाला आहे. राज्यस्थानला 10426.78 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्याला 10930.31 कोटी रुपयांचा कर परतावा निधी दिल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान, व अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या करपरताव्या संदर्भात आभार मानले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मनापासून धन्यवाद देतो असे म्हटंले आहे.
आमच्या महाराष्ट्रातील लोकांच्या विकासाच्या प्रयत्नांना यामुळं बळ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आणी मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या विकासाचं काम सुरु राहील,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या एक्सवरून या बाबतची माहिती दिली आहे.
0 Comments