Unified Pension Scheme केंद्र शासनाने एकीकृत निवृत्ती वेतन (UPS) योजना दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर केली होती.
केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजना (यूपीएस) ची अधिसूचना जारी केली आहे. जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
यूपीएस पेन्शनची अधिसूचना जारी १ एप्रिल पासून होणार लागू
एकीकृत निवृत्ती वेतन (UPS) ही योजना केंद्र शासनाने दिनांक २४ जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनूसार १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
'Unified Pension Scheme' या योजनेत कर्मचाऱ्यांना एनपीएसचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यूपीएसचा पर्याय द्यावा लागणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी या एकीकृत निवृत्ती वेतन (UPS) योजने मध्ये देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्यावर्षी दिनांक २४ ऑगस्ट 2024 रोजी एकीकृत निवृत्ती वेतन योजना unified pension scheme (यूपीएसला) मंजुरी दिली होती.
यूपीएसमध्ये १० हजार रुपयांच्या किमान निवृत्ती वेतनाची हमी देण्यात आलेली आहे.
यूपीएसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेची दोन भागात विभागणी केली जाणार आहे.
कर्मचारी आणि केंद्र सरकार मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील १०-१० टक्के रक्कम व्यक्तिगत निधीत जमा करतील.
संयुक्त निधीत ८.५ % अतिरिक्त रक्कम केंद्र सरकार जमा करणार आहे.
व्यक्तिगत निधीत गुंतवणुकीचा पर्याय ज्यांनी निवडलेला नाही त्या कर्मचाऱ्यांसाठी 'डिफॉल्ट गुंतवणूक पॅटर्न'ची एनपीएस योजना लागू असेल.
विद्यमान कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने एनपीएससंदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असलेली चिंता मिटवण्याच्या दृष्टीने यूपीएसचा पर्याय सुचवला होता.
कर्मचाऱ्यांचीं 25 वर्ष सेवा झाली असल्यास कर्मचाऱ्यांच्या २५ वर्षे सेवेतील शेवटच्या १२ महिन्यांचे मूळ वेतन ८० हजार रूपये असल्यास त्या कर्मचाऱ्यांना ४० हजार रूपये पेन्शन व अधिक वेळोवेळी महागाई भत्ता व तसेच सेवा अवधीत निधीतून पैसा काढलेला नसल्यास कॉर्पस फंड १ कोटी रुपये होईल.
तूम्हाला "Unified pension scheme" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments