Ahilyanagar beed parli railway सद्य स्थितीत अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सूरू असून बीड रेल्वे स्टेशन पर्यंतच्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून विघनवाडी (ता.शिरुर) ते नवगण राजुरी ( ता. बीड) व नवगण राजुरी ते बीड या पूर्ण झालेल्या लोहमार्गावर निरीक्षण व जलदगती चाचणी होणार आहे.
बीड रेल्वे स्टेशन पर्यंत रेल्वेचे काम पूर्ण
अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम बीड रेल्वे स्टेशन पर्यंत पूर्ण झाले आहे या पूर्ण झालेल्या लोहमार्गावर
विघनवाडी (ता.शिरुर) ते नवगण राजुरी ( ता. बीड) व नवगण राजुरी ते बीड या पूर्ण झालेल्या लोहमार्गावर निरीक्षण व जलदगती चाचणी (CRS Test) होणार आहे.
या आगोदर दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी खा.बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत विघनवाडी ते नवगण राजुरी या रेल्वे मार्गावर रेल्वेची हायस्पीडचाचणी यशस्वीपणे घेण्यात आली होती त्यावेळी खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली त्याचबरोबर पुष्पहार घालून रेल्वे इंजिनची पुजा देखील केली होती.
आता आज दि. 4 फेब्रुवारी 2025 व दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी १०.०० ते संध्या. ६.०० वाजेदरम्यान आहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेच्या कामातील विघनवाडी (ता.शिरुर) ते नवगण राजुरी ( ता. बीड) व नवगण राजुरी ते बीड या पूर्ण झालेल्या लोहमार्गावर निरीक्षण व जलदगती चाचणी (CRS Test) होणार आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी रेल्वे मार्गापासून दूर रहावे, गुरे व पाळीव प्राणी रुळावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
तसेच परिसरातील नागरिकांनी सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
0 Comments