राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ महिगाई भत्ता आता 53%

DA hike maharashtra government
DA hike maharashtra government

DA hike maharashtra government employees राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबतचा शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ.

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता त्यानुसार शासनाने महागाई भत्तामध्ये तीन टक्के दराने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 जुलै 2024 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै 2024 ते दिनांक 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. 

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा त्या लेखा शीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. 

अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उप लेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदाना बाबतचा खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखा शिर्षाखाली हा खर्च टाकण्यात यावा असा शासन निर्णय शासनाने प्रसिद्ध केला आहे.

Post a Comment

0 Comments