Mahaarogya kaushalya vikas yojana महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजना नावनोंदणी सूरू झाली आहे जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य विकास प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम ही अभिनव व महत्त्वकांशी योजना तयार करण्यात आली आहे.
याकरिता महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय तसेच उत्कृष्ट खाजगी रुग्णालयाच्या समन्वयाने प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.
कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी इच्छुक 18 ते 45 या वयोगटातील उमेदवारांना मुख्यमंत्री महारोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकासाचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण पुढील तीन महिन्यात देण्यात येईल या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अल्पमुदतीचे प्रशिक्षण रोजगारासाठी आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आरोग्य क्षेत्रातील NSQF संलग्न विविध अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते यामध्ये अभ्यासक्रमांचा प्रशिक्षण कालावधी सर्वसाधारणपणे सहाशे तासापर्यंत आहे. त्यानंतर त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन केले जाते यशस्वी उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यात येते त्यानंतर यशस्वी उमेदवारांना रोजगार स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात.
महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी खालील पद्धतीने अर्ज करायचा आहे.
https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/mahaaarogya_scheme
तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद जय महाराष्ट्र.
0 Comments