आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आरोग्य भवन मूंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली.
NHM कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे आरोग्यमंञी यांनी दिले निर्देश
सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीस आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक विजय कंदेवाड, संचालक डॉ.स्वप्नील लाळे यांचेसह अवर सचिव व सहसंचालकस्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत समावेश करणे तसेच त्यांचे मानधन वाढीचा प्रस्ताव लवकर सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा असावा.
आठ वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या समूपदेशाने करण्यात याव्यात. त्यानंतर विनंती बदल्या करण्यात याव्यात, असे मंत्री आबिटकर यांनी यावेळी निर्देश दिले.
केंद्र सरकारने त्यांच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे १७ ठिकाणी कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करणे, तसेच टीबी मुक्त पंचायत व तंबाखू मुक्त शाळा हे अभियान सुरू करण्याबाबत सूचनाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
0 Comments