Ladki bahin yojana new update मूख्यमंञी माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अपाञतेच्या यादीमध्ये नाव असलेल्या 26 लाख महिला लाभार्थ्यांचीं जिल्हास्तरावरून छाननी सूरू झाली आहे अशी माहीती महिला व बालविकासमंञी आदिती तटकरे यांनी दिली आहे.
26 लाख लाडकी बहीणींची जिल्हास्तरावर छाननी झाली सूरू Ladki bahin yojana update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.
त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.
छाननी झाल्यानंतर जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील अशी माहीती महीला व बालविकासमंञी आदिती तटकरे यांनी दिली आहे.
0 Comments